ऐरोलीत धुळीचे साम्राज्य - याला जबाबदार कोण?? Airoli dust pollution
#airoli
#navimumbai
ऐरोली मध्ये पटनी रोड वर गुड हार्मनी पासुन ते कॅप जेमिनी कंपनी पर्यंत, रस्ते आणि फुटपाथ वर धुळच धुळ पडली आहे. या धुळीमुळे सकाळी आणि संध्याकाली चालणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे हि धूळ हवेत उडून सगळीकडे पसरत आहे. घरामधील फर्निचर वर रोज हि धूळ जमते. यावरुन कळते की या धुळेचे प्रदूषण खुप जास्त प्रमाणात वाढले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी एनएमएमसी वॉर्ड ऑफिस आणि मुख्य कार्यालय ला महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे.
याला जबाबदार कोण?
माझ्या मते याला जबाबदार इथे सुरु असलेले बांधकाम रस्ते खोदून केली जाणारे काम आणि एनएमएमसी चे या समस्या कडे दुर्लक्ष हे याला जबाबदार आहे. रस्ता खोदल्यानंतर कंत्राटदार रस्ता, फूटपाथ साफ न करता तसेच निघून जातात. याचा सगळा त्रास इथे राहणाऱ्या नागरीकांना सोसावा लागतो.
NMMC ने काय करावे?
- सध्या जे काम सुरु आहेत (एक कॉन्ट्रॅक्टर फायबर लाइन टाकतो आहे - बहुटेक जिओ वाले असावे, तसेच नवीन लाइफस्टाइल मॉल च्या आस पास बांधकाम सुरु आहे), तिथल्या रस्त्यावरील माती उचलाने, व्हॅक्यूम करणारा ट्रक चालवणे, फूटपाथ स्वच्छ करून पाण्याने धुणे म्हणजे त्यावर माती राहणार नाही
- इमारत आणि रस्त्याच्या कामाची परवानगी देतांना, काम झाल्यावर रस्ते आणि फूटपाथ स्वच्छ करूण देण्याची अट त्या परवानगी मध्ये NMMC ने टाकली पाहीजे.
- येथील सुरु असलेल्या बांधकाम आणि रस्ते कंत्राटदारांचे करारामध्ये मधे एक नवीन स्वच्छतेची अट टाकणे - रस्ता किवा फुटपाथवर त्यान्नी धूळ , खडी टाकल्यास त्यांना १० हजर रुपये दररोज दंड करणे
- NMMC चे पर्यवेक्षक ने दर दोन दिवसांनी या भागात पायी सर्वेक्षण करून रिपोर्ट देणे
- NMMC ने नागरिकांसाठी एक नंबर फोन नंबर देण यावर नागरिकांनी तक्रार दिल्यावर त्वरीत स्वच्छता झाली पाहीजे आणि दोषी लोकांवर कारवाई सुद्धा झाली पाहीजे.
मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर शांत राहू नये. हा तुमच्या माझ्या परिवाराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. हि समस्या सोडवणे होईपर्यंत सर्वान्नी याविरुद्ध आवाज उठवला पाहीजे. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.
NMMC च्या अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर कृती योजना करून आम्हा नागरिकांना यावर उत्तर द्यावे हि विनंती
@Sapre Ward Officer @Mr Mhase Sanirary Officer, Airoli @S I Jadhav. जाधव NMNC Ward Office
#airoli #nmmc #airpolltion #navimumbai #lokmat #sakal